रेकॉर्ड वरील आरोपीला अग्निशस्त्रासह केले जेरबंद - P24taaslive.in
🔴 "P24taaslive" साठी महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, तालुका व जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे; इच्छुक, जिद्दी व प्रामाणिक व्यक्तींनी त्वरित 7210081007 या नंबरवर संपर्क साधावा किंवा p24taaslive@gmail.com वर ईमेल पाठवावा.
🟦 ताज्या घडामोडी - शिरूर • पुणे • महाराष्ट्र • ग्रामीण बातम्या • पॉलिटिक्स • गुन्हेगारी • शिक्षण • आरोग्य

Post Top Ad

Post Top Ad


Monday, 4 August 2025

रेकॉर्ड वरील आरोपीला अग्निशस्त्रासह केले जेरबंद

पुणे : नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार सार्थक भगत (वय २२, रा. कोल्हेवाडी फाटा, सिंहगड रोड) याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त करून त्यास अटक करण्यात आली आहे.
पोलीस अंमलदार बंटी मोरे व स्वप्नील मगर पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कोल्हेवाडी बसस्टॉपवर थांबलेला असल्याचे कळताच, वरिष्ठांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपीकडून ३५,५००/- रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५५/२०२५ प्रमाणे आर्म अ‍ॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी हवेली पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध 
गुन्हे दाखल असल्याचेही निष्पन्न झाले आहे. सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ श्री. संभाजी कदम, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग श्री. अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, गुन्हे निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहाय्यक पो.नि. राहुल यादव व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, राजु वेगरे, प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भिमराज गागुर्डे, उत्तम शिंदे, निलेख कुलथे, अक्षय जाधव व सतिश खोत यांनी केली.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

🙏 आमच्या पोर्टलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! | 📩 आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! | 🌐 पुन्हा अवश्य भेट द्या!